Take a fresh look at your lifestyle.

सावधान.. ‘त्यामुळे’ वाढतो गर्भाशय मुख आणि स्तन कॅन्सरचा धोका..!

मी वयात मुलींचे विवाह हे फ़क़्त एक प्रमुख सामाजिक कारण नसून आरोग्याच्या दृष्टीनेही हे काळजीचे आहे. कारण, वयात येण्यापूर्वीच मुलींचे लग्न केल्याने भारतीय महिलांमध्ये गर्भाशयाचे मुख आणि स्तन कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे.

Advertisement

औरंगाबाद येथील डॉ. वर्षा देशमुख यांनी वुमन्स डॉक्टर्स विंग आयएमए यांच्यातर्फे आयोजित ‘महिलांमधील कर्करोग- कारणे, निदान, उपचार, प्रतिबंध’ या ऑनलाइन सत्रात याबाबत सविस्तर माहिती दिली.

Advertisement

यावेळी कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनुप तोष्णीवाल, स्त्रीरोग तज्ञ् डॉ. अपर्णा राऊळ, वुमन डॉक्टर्स विंगच्या अध्यक्ष डॉ उज्ज्वला दहिफळे, सचिव डॉ. शिल्पा आसेगावकर,  इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे आदि उपस्थित होते.

Advertisement

डॉ. देशमुख म्हणाल्या की, गर्भाशयाचे मुख आणि स्तन कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. कमी वयात मुलींचे विवाह हे एक प्रमुख कारण आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जंतूंच्या प्रादुर्भावामुळे होत असून त्याचे २०२३ पर्यंत उच्चाटन व्हावे त्यादृष्टीने भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना प्रयत्नशील आहे.

Advertisement

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग थांबवण्यासाठी लस उपलब्ध आहे. ९ ते २६ वर्षे वयोगटातील मुलींना ती दिली पाहिजे. महिलांनी सेल्फ केअर या संकल्पनेनुसार स्वतःच्या पॅप स्मिअर व मॅमोग्राफी चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. लवकर निदान होऊन वेळीच उपचार मिळून चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य रुग्णांना मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

ही घ्यावी काळजी :

Advertisement
  • गाठ आहे, बायोप्सी करणे या गोष्टींनी घाबरून न जाता महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी.
  • प्रत्येक गाठ कॅन्सरचीच आहे असे नाही.
  • व्यायामाचा अभाव, स्तनपान न करणे, चुकीच्या जीवनशैलीमुळे स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.
  • स्तनाच्या कॅन्सरचे लवकर धोका ओळखण्यासाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करून काही लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
  • कुटुंबामधील कोणास कर्करोग असेल तर दरवर्षी मॅमोग्राफी करून घ्यावी.
  • काही कॅन्सर अनुवांशिक असतात.

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply