मुंबई :
महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढून भाजपला त्यांची जागा दाखवण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केली आहे. त्याचवेळी तिसरा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे मात्र याबाबत अजूनही ठरलेले नाही.
राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी करून लढवणार असतानाच यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारचा तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने सोमवारी (दि. २२) बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनी एकत्रित आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. मात्र पुणे, कोल्हापूर यासारख्या महापालिकांमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून वेगळा निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई, औरंगाबाद, नवी मुंबईसह १० महानगरपालिका, ९८ नगर परिषदा आणि २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका मानल्या जातात. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी या निवडणुका एकत्रतपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कारण, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हेच तुल्यबळ पक्ष आहेत. तिथे हे तिघे किंवा यातले दोघे एकत्रितपणे लढणार असल्यावर मग या पक्षांच्या इच्छुकांना अपक्ष किंवा भाजप, वंचित वा मनसे हेही पर्याय असतील. अशावेळी इतर पक्षांची ताकद वाढून महाविकास आघाडीच्या घटकांची ताकद कमी होणार आहे. त्यावर हे पक्ष कसे मात करणार याकडे राज्याचे लक्ष असेल.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट