Take a fresh look at your lifestyle.

टेलिफोन बुथवर काम करणारा मुलगा झाला कॉमेडी सुपरस्टार; वाचा, त्याची प्रेरणादायी गोष्ट

संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. फक्त काहींचा टीव्हीवर दिसतो आणि काहींचा दिसत नाही… एवढाच काय तो फरक.

Advertisement

प्रत्येकाला वाटत राहतं की, आपलं आयुष्य म्हणजे एक फिल्म आहे. असाच एक मुलगा होता ज्याला गाण्याचा आणि गायचा छंद होता. मात्र या मुलाला आपण आज कॉमेडीचा सुपरस्टार म्हणून ओळखतो.   

Advertisement

संघर्ष जितना कठीण होगा जीत उतनी शानदार होगी असं म्हणतात ना ते या स्टार बाबत खरं आहे. कुठलाही नाटक किंवा सिनेमाचा बॅकराऊंड नाही. पण कष्ट करायची तयारी आणि जिद्द या जोरावर आज तो बॉलिवूडचा कॉमेडी किंग झाला आहे.

Advertisement

सगळ्या अभिनेत्यांना पर्याय असू शकतात पण त्याला कुठलाही पर्याय आजही मिळत नाही. होय आम्ही बॉलिवूडचा कॉमेडीचा किंग कपिल शर्मा बद्दल बोलत आहोत. सिंगर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कपिलच्या संघर्षांचा प्रवास अखेर कॉमेडी किंगवर येऊन संपला.

Advertisement

आज तो चाळीशीत पदार्पण करतो आहे. ज्यानं भारतातील कॉमेडीची व्याख्याच बदलून टाकली. याआधी कॉमेडिन्सना साइड रोलमध्ये ठेवलं जायचं पण यानं दाखवून दिलं की कॉमेडियन लीड रोल सुद्धा करु शकतो. आज जगभर त्याचे चाहते आहेत. लोक त्याचा प्रोग्रॅम बघून दुखणं विसरून जायचे इतकी जादू त्याच्या कलाकारीत होती.
कुटुंबाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थितीशी सामना करण्यासाठी कपिलनं टेलिफोन बुथवरही काम केलं. पण 2006 मध्ये त्याचं जीवन अनपेक्षितपणे बदललं. या वर्षात त्यानं कॉमेडी शो ‘हंस दे हंसा दे’मध्ये भाग घेतला होता. 2013 मध्ये कपिलच्या लाइफमध्ये सर्वात मोठा बदल झाला. त्यानं स्वतःचा शो कॉमेडी नाइट्स विथ कपिल सुरू केला आणि तो हिट झाला. या कार्यक्रमाने त्याचं आयुष्य बदलून टाकलं.

Advertisement

अशा या अवलियाने चित्रपटातही हातपाय मारले मात्र तो तितका यशस्वी झाला नाही. मात्र आजही असे म्हटले जाते की, राजू श्रीवास्तव, राजपाल यादव यांच्यानंतर शेवटचा कॉमेडी सुपरस्टार हा कपिल शर्माच असेल.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply