Take a fresh look at your lifestyle.

म्हणून युनोलाही घ्यावाच लागला धर्माचा आधार; पहा किती शक्तिशाली आहे ‘ही’ व्यवस्था

धर्म ही एक प्रभावी अशी गोष्ट आहे. जसा त्याचा मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात सकारात्मक अर्थाने काही परिणाम आहे, तसाच काहीअंशी नकारात्मक परिणामही दिसतो. याच प्रभावी गोष्टीचा उपयोग पर्यावरण रक्षणाच्या हेतून करण्याचे आता संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरवले आहे.

Advertisement

यूएन पर्यावरण कार्यक्रमांतर्गत (यूएईपी) ‘फेथ फॉर अर्थ’ अभियान सुरू केले आहे. यामध्ये पृथ्वीला वाचवण्यासाठी आता यूएईपी धर्माच्या आश्रयाला आले आहे. हवामान बदल या शतकातील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

भारतातील या मोहिमेचे प्रमुख अतुल बगई यांनी सद्गुरू श्री श्री रविशंकर, शिवानीदीदी आणि राधानाथ स्वामींसारख्या धर्मगुरूंसोबत चर्चा सुरू केली आहे. यंदा जगातील धर्मगुरूंची संसद जिनिव्हात होणार आहे. यात धार्मिक इको योद्धाही येतील. विज्ञान आणि धार्मिक-अाध्यात्मिक नैतिकता जोडून या मोहिमेला व्यापक रूप दिले जाईल.

Advertisement

या मोहिमेमुळे पोप फ्रान्सिस, शिया इस्मायली मुस्लिमांचे इमाम ‘इको योद्धा’ म्हणून ओळखले जातील. २०१७ मध्ये यूएनच्या बैठकीत १९३ देशांनी आगामी दशकासाठी तीन उद्दिष्टे ठरवली आहेत. पहिले गरिबी हटवणे, दुसरे सर्वांना शिक्षण देणे आणि तिसरे पर्यावरणाचे रक्षण. या चर्चेतून निष्पन्न झाले की, पर्यावरण रक्षणासाठी जगभरातील धार्मिक संघटनांचे जेवढे योगदान मिळायला हवे तेवढे मिळत नाही. त्यामुळे यात धर्माला सहभागी करून घेतले जाणार आहे.

Advertisement

धर्माची ताकद आहे इतकी मोठी :

Advertisement
  1. जगातील ८०% लोक धार्मिक नैतिकतेचे पालन करतात
  2. धार्मिक संघटनांची एकूण संपत्ती एकत्र केली तर ती जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
  3. जगातील १०% जमीन धार्मिक संघटनांच्या ताब्यात
  4. ६०% शाळा आणि ५०% रुग्णालये धार्मिक संघटनांची
  5. जगभरात सुमारे ४,३०० हजार यापेक्षाही जास्त धर्म

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply