Take a fresh look at your lifestyle.

IMP इन्फो : म्हणून ते इंजेक्शन आहे फ़क़्त 16 कोटी रुपयांचे..!

इंजेक्शन घ्यायचे किंवा दवाखान्यात जायचे म्हटले तरीही आपल्याला कापरे भरते. कारण, टोचण्याची जशी भीती असते, तशीच त्यासाठी खर्च होणारे भरमसाठ पैसेही तितकेच महत्वाचे असतात. मात्र, एकाच इंजेक्शनसाठी जर 16 कोटी रुपये मोजावे लागणार असतील तर मग अनेकांना तर हे ऐकूनच चक्कर येऊ शकते. मात्र, असेही एक इंजेक्शन आहे. ज्याची किंमत आहेत तब्बल 16 कोटी रुपये.

Advertisement

होय, आपण जर तीरा कामत या मुलीची बातमी वाचली असेल तर आपणास याची ही किंमत अजिबात आश्चर्यकारक वाटणार नाही. मात्र, जर ती बातमी वाचली नसेल तर मग धक्कादायक नक्कीच वाटेल. हे इंजेक्शन आहे स्पायनल मस्क्यूलर अॅट्रोफीने (एसएमए) या आजारावरील.

Advertisement

पाच महिन्यांची तीरा कामत स्पायनल मस्क्यूलर अॅट्रोफीने (एसएमए) ग्रस्त आहे. तिला वाचवण्यासाठी झोलजेन्समा नावाचे इंजेक्शन अमेरिकेहून भारतात येत आहे. त्याचीच किंमत आहे 16 कोटी रुपये. दोनेक दिवसात तीराला हे इंजेक्शन दिले जाईल. पुढील महिनाभरात मग तिला याचा कितपत उपयोग झालाय हेही स्पष्ट होईल.

Advertisement

दोन वर्षांपेक्षा लहान मुलांवरील उपचारांत झोलजेन्समा इंजेक्शनचा वापर केला जातो. तीरा कामत ही स्पायनल मस्क्यूलर अॅट्रोफीने (एसएमए) ग्रस्त चिमुरडी पाच महिन्यांचीच आहे. नोव्हार्टिस कंपनीचे झोलजेन्समा नावाचे इंजेक्शन तिला दिले जाणार आहे.

Advertisement

कंपन्याना औषध संशोधन व बौद्धिक मालमत्तेचा खर्च येतो. तो त्या ग्राहकांकडून वसूल करतात. १० हजार मुलांमधून एकालाच स्पायनल मस्क्यूलर अॅट्रोफी हा आजार हाेतो. म्हणजे जगभरातील ७०० कोटी लाेकसंख्येत फक्त ७ लाख रुग्णच याआजाराचे असू शकतात. परिणामी कमी रुग्णांमध्ये याचा संशोधन खर्च वसूल करावा लागतो. त्यामुळे ते औषध अतिमहाग आहे.

Advertisement

हे औषध तयार करणारी कंपनी नोव्हार्टिसने ६५.२५ हजार कोटींना विकत त्याचा फॉर्म्युला विकत घेतला आहे. यामुळे प्रत्येक डोसमागे त्याचीही भर पडली आहे. हे औषध रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या गुणसुत्रांची कमतरता कायमची संपवते. इतके ते परिणामकारक आहे.

Advertisement

या आजाराने ग्रस्त मुलांना अाधी स्पिनराजा इंजेक्शन दिले जायचे. त्याच्या पहिल्या डोसची किंमत ५.६३ कोटी रुपये आहे. यानंतर आयुष्यभर दरवर्षी चार डोस घ्यावे लागतात. त्याची किंमत २.६३ कोटी रुपये आहे. तथापि, झोलजेन्समा इंजेक्शनचा एकाच डोस पुरेसा आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply