Take a fresh look at your lifestyle.

तर लोकं रस्त्यावर मरतील; महाविकास आघाडीच्या ‘त्या’ मंत्र्यांनी दिला गंभीर इशारा

मुंबई :

Advertisement

देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर संकट वाढलं आहे. विदर्भात नागपूर यवतमाळ आणि अमरावती मध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यात एका आठवड्याचं लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली.

Advertisement

सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी याचं पालन करावं. आम्हाला आता नाईलाजास्तव फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सारंकाही पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

Advertisement

पुढे त्या म्हणाल्या की, अमरावतीत सात दिवस सध्यातरी काही करता येणार नाही. काही एमरजन्सी असेल तर तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून काही सोय करता येईल. नाहीतर कोरोना केसेस वाढू द्या. हजारो लोकं मरतील रस्त्यावर.

Advertisement

आज लोकांना सगळ्या मुभा देऊन सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सोयीच्या करुनही लोक ऐकत नाही. लोकं मास्क वापरत नाहीत. पोलीस, डॉक्टर आपलं काम करत आहेत. मग आता करायचं काय? त्यामुळे सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करत आहोत.

Advertisement

आता आपल्याला विचार करायचा आहे की, आपल्याला काय केलं पाहिजे. दंडे खाऊन मरायचं की कोरोना दूर करुन जिवंत राहायचंय? कडक राहावं लागणार आहे. कडक राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही, असेही पुढे बोलताना त्या म्हणल्या.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply