Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाची लस घेतल्यावर पोलीसाचा मृत्यू; श्वास घ्यायला येत होती अडचण, ‘अशी’ घडली घटना

औरंगाबाद :

Advertisement

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसू लागला आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये 3 मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोरोनावरील लस घेऊनही 2 डॉक्टरांना कोरोना झाल्याची घटना समोर आली होती. आता याच संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Advertisement

औरंगाबाद येथे कोरोनाची लस घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात आणि पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Advertisement

सध्या आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दलातील कर्मचार्‍यांना कोरोनाची लस दिली जात आहे. अशीच लस औरंगाबादेतील एका पोलिसाला दिली गेली. आठ दिवसांपूर्वी सदर पोलीसचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते.

Advertisement

काही दिवसांनी या पोलिसाला कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तातडीने त्यांच्यावर उपचार चालू केले. मात्र उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झालाय.

Advertisement

भास्कर शंकर मेटे असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ते  बेगमपुरा औरंगाबाद मधील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान 2 दिवसांपूर्वी 2 पोलिसांना लस घेऊनही पुन्हा कोरोनाने गाठल्याचे समोर आले आहे.

Advertisement

हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यातील आहेत. या आधी लस टोचल्यानंतरही कोरोना पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply