Take a fresh look at your lifestyle.

म्हणून संजय राऊतांनी थेट दिले अर्थमंत्री सीतारामन यांना चर्चेसाठी आमंत्रण; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

Advertisement

आक्रमक परखड आणि स्पष्टवक्ते असलेले खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना चर्चेला आमंत्रण दिले आहे.

Advertisement

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती याआधीचे इंधनदराचे सर्व विक्रम मोडत आहेत. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल 99 रुपये प्रति लिटरच्या वर किंवा जवळपास आहे. येत्या काही राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपये होणार असल्याची चिन्हे आहेत.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘ग्राहकांना परवडणाऱ्या दरात पेट्रोल-डिझेल मिळावे,यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पुढाकार घ्यायाला हवा’, असे म्हटले होते. यावरून राऊत यांनी सीतारमण यांना चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

Advertisement

यावेळी राऊत यांनी चक्क भाजपला आंदोलन करण्याचा सल्लाही दिला आहे. ‘वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षानं आंदोलन करावं. महागाई आहे, त्यामुळे निदान महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने तरी आंदोलन करावं’, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply