Take a fresh look at your lifestyle.

थोरात जिल्हा बँकेत जोरात; ‘त्या’ कारणामुळे विखे पडले मागे

अहमदनगर :

Advertisement

नगर जिल्हा बँकेच्या निवडणूकीचे निकाल लागलेले आहेत. भाजपकडे 7 तर महाविकास आघाडीकडे 14 संचालक आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सूत्रे मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती.

Advertisement

विखे आणि थोरात यांच्यात असलेले सख्य अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एवढेच नाही तर दिल्लीतही या दोन्ही नेत्यांचा स्नेह माहिती आहे. साखर कारखाने, सहकारी संस्था यापलीकडे जाऊन राजकारणात जिल्हा बँकेवर संचालक म्हणून जाण्यास अनेक आमदार इच्छुक असतात.

Advertisement

जिल्हा बँकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी यावेळी आमदार राधाकृष्ण विखे आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात चांगलीच टस्सल होणार, असे दिसत होते. मात्र नेहमीप्रमाणे त्यांची ‘समझोता एक्स्प्रेस’ चालली आणि बँकेच्या निवडणुकीत इतिहास घडला. तब्बल 17 सदस्य बिनविरोध निवडून आले. असे असले तरीही थोरात यांचेच जिल्हा बँकेवर वर्चस्व असल्याचे निवडणूक निकालावरून सिद्ध झाले आहे.        

Advertisement

विखे मागे पडले कारण सध्या विखे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे सहकारात खूप कमी काम आहे. परिणामी सहकारी क्षेत्रातील, संस्थातील निवडणूकात भाजप नेहमीच मागे पडताना दिसतो. दुसरे कारण म्हणजे सुरूवातीला या निवडणुकीसाठी विखे यांच्यासह माजी आमदार राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले यांची समिती गठित करण्यात आली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदे यांची निवडणुकीची तयारी नसल्याचे कळले.

Advertisement

आणि कर्डिले तर थेट थोरातांच्या बैठकीला उपस्थित राहिले त्यामुळे विखे एकाकी पडल्याचे समोर आले. अशातही विखे समर्थक हे बँकेच्या संचालकपदी निवडून गेले आहेत. शक्य होईल तेवढी विखे गटाने ताकद दाखवली आहे. मात्र अखेर जिल्हा बँकेत वर्चस्व मिळवण्यात विखेंना अपयश आलं.      

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply