Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष; आज होऊ शकते मोठी घोषणाही

मुंबई :

Advertisement

देशभरात सध्या करोना विषाणूची लाट आलेली आहे. याच्या बातम्या येत असतानाच नागरिकांकडून काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यासाठी कोणती नवी घोषणा किंवा नियमावली लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

जनजीवन हे पूर्वपदावर येत असताना कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. यामुळेच आता राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पुन्हा लॉकडाउन केला जाऊ शकतो, असा इशारा यापूर्वीच दिला होता. यामुळे आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply