Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : थोरातांनी केले ‘ते’ महत्त्वपूर्ण भाष्य; पहा कर्डिलें असणार की नाहीत किंगमेकर ते

अहमदनगर :

Advertisement

आता अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले असल्याने संचालकपदी कोण विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी अध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार, यावरून खलबतं सुरू झालेली आहेत. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

Advertisement

नगर जिल्हा हा सो-धा म्हणजेच सोयर्‍या-धायर्‍याच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. असे असले तरीही नगरच्या राजकरणात कधीही काहीही होऊ शकते. एकाकी पडलेल्या कर्डिले यांना कुस्तीच्या आखाड्यात आणि राजकीय मैदानात ‘वस्ताद’ समजले जाते. आता किंगमेकरची भूमिका कर्डिले निभावणार असल्याचे समजत आहे.

Advertisement

मात्र, महाविकास आघाडीची सूत्रे हातात असलेल्या बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितले की, जिल्हा बँकेत आम्ही राजकारण करत नाही. पदाधिकारी निवड प्रक्रियेत आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ.

Advertisement

पुढे ते म्हणाले की, तकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा उपक्रम या बँकेने केलेला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे आमचं सूत्र असून ते आम्ही टिकवतो.

Advertisement

जिल्हा बँकेत राजकारण नको म्हणत असले तरी संचालकांची यादी बघता जिल्हा बँकेत राजकारण होते हे स्पष्टच आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी राजकारण होणार, हेही निश्चित आहे. कर्डिले यांनी आपली ताकद पुन्हा दाखवली आहे. आता अध्यक्षपदासाठी कर्डिले कुणासाठी फिल्डिंग लावतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply