Take a fresh look at your lifestyle.

‘ते’ १६५ टीएमसी पाणी हीच मराठवाड्याची गरज; पहा मुंडेंचे नेमके काय आहे म्हणणे

औरंगाबाद / बीड :

Advertisement

मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असेल तर पश्चिम वाहिनीचे अरबी समुद्रात जाणारे पाणी आणावेच लागेल असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

टोकवाडी येथील शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या अद्ययावत जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे उद्घाटन मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मराठवाड्याचा दुष्काळ आणि सहकारातील अनागोंदी यावर भाष्य केले.

Advertisement

यावेळी आमदार प्रकाश सोळंके, आमदार संजय दौंड, माजी आमदार विजय गव्हाणे, बाबूराव मुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बन्सीअण्णा सिरसाट, दादासाहेब मुंडे, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, अ‍ॅड. गोविंद फड, बालाजी मुंडे, भरत चामले, प्रा. गंगाधर शेळके, डॉ. सुरेश चौधरी, लक्ष्मण पौळ, व्यंकटेश शिंदे, सूर्यभान मुंडे, ज्ञानोबा गडदे, राजेभाऊ पौळ, मोहन सोळंके, राजेभाऊ काळे आदी उपस्थिती होते.

Advertisement

पश्चिम वाहिनीचे अरबी समुद्रात जाणारे १६५ टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवायला हवे. यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल. याबाबत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मुंडे यांनी म्हटले.

Advertisement

तसेच सहकाराच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, एकेकाळी शेतकरी व सामान्य माणसाच्या विकासाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात होत असलेल्या पापामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. हे पाप कमी झाल्याशिवाय सहकार क्षेत्राचा उद्धार होणार नाही. सहकारी संस्थांना पुनरुज्जीवन मिळवून देण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply