Take a fresh look at your lifestyle.

म्हणून त्यावेळी हरलो.. पण..; वाचा कर्डिले यांनी केलेले अनेक गौप्यस्फोट..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री व भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी दणक्यात विजय मिळवला आहे. ते आता जिल्हा बँकेचे पुन्हा एकदा संचालक बनले आहेत. मात्र, निवडणूक जिंकल्यावर बिनविरोध संधी न मिळण्याचे आणि विधानसभा निवडणूक हरल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले आहे.

Advertisement

कर्डिले यांनी म्हटले आहे की, आताच्या निवडणुकीत सर्व साखर कारखानदार एक झाले होते. त्यांनी माझ्यासारख्याला संचालक होऊ न देण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सामान्य मतदारांनी मला पुन्हा एकदा संचालक होण्याची संधी दिली आहे. मिळून मिसळून बँकेत पैसे खाण्याचे बंद करून नफा थेट शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केल्याने मला बाजूला ठेवण्यासाठी सगळे प्रस्थापित एक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभव हा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष यामुळे झाला होता. जिल्हा बँक निवडणुकीत त्यामुळेच सर्व ताकद पणाला लावून निवडणूक जिंकल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे.

Advertisement

कारखानदार बँकेचा नफा वाटून खात होते. तो बंद करून थेट शेतकऱ्यांना देण्यासाठी माझा आग्रह राहिला आहे. जिरायत भागातील शेतकऱ्यांना कर्जाचे वापट करून आर्थिकदृष्ट्या मदत केली. त्यामुळेच अनेकांनी मला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदार माझ्या पाठीशी राहिले असेही त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply