अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ‘असे’ होणार राजकारण; ‘तो’ व्यक्ती ठरणार किंगमेकर
अहमदनगर :
आता अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले असल्याने संचालकपदी कोण कोण विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरीही नगर जिल्हा हा सो-धा म्हणजेच सोयर्या-धायर्याच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे.
आताच हाती आलेल्या निकालानुसार, सर्व जागांवर बिनविरोधसाठी अखंड प्रयत्न करूनही माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. असे असले तरीही सोसायटयांवर त्याच्यामध्ये त्याठिकाणी वर्चस्व असल्याने कर्डिले मोठ्या फरकाने निवडून आले. यावेळी कर्डिले एकटे पडले असले तरीही त्यांनी आपली राजकीय पकड अजून ‘ढील्ली’ झाले नसल्याचे दाखवून दिले.
आता निकाल स्पष्ट झाल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्या महाविकास आघाडीकडे 14 तर भाजपकडे 7 जागा आहेत. एकाकी पडलेल्या कर्डिले यांना कुस्तीच्या आखाड्यात आणि राजकीय मैदानात ‘वस्ताद’ समजले जाते.
कर्डिले यांच्याकडे कुठलाही साखर कारखाना नसला, कुठलेही कॉलेज नसले तरीही प्रत्येक पक्षात त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. आणि नगर जिल्ह्यात युती आघाडीपेक्षा सोयर्या धायर्याचा शब्द पाळला जातो, असे इतिहास सांगतो.
योगायोगाने सोयरे धायरेच्या राजकारणामुळे विविध पक्षात असलेले नातेसंबंध कर्डीलेंच्या कामी येवू शकतात. तसेच ते भाजपमध्ये आहेत आणि या निवडणुकीदरम्यान कर्डिले यांनी थोरातांशीही जुळवून घेतले आहे.
त्यामुळे एकूण वातावरण बघता कर्डिले हे किंगमेकरची भूमिका निभावणार असल्याची शक्यता आहेच. राजकारणात सर्व शक्यतांना महत्व द्यावे लागते. त्यामुळे ‘त्याच्यामध्ये त्याठिकाणी’ कर्डिले हे अध्यक्षपदासाठीही निवडले जाऊ शकतात. अर्थात ही वाट खूपच अवघड असेल, मात्र राजकारणात काहीही शक्य असते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज