Take a fresh look at your lifestyle.

भ्रष्टाचार हाच मुद्दा असणार ‘औरंगाबाद’च्या निवडणुकीत..!

औरंगाबाद :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने बँकेची झालेली दुर्दशा आणि भ्रष्टाचार हेच मुद्दे प्रचारात गाजण्याची शक्यता आहे.

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या सोमवारची शेवटची तारीख असून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासह सर्वच जागांवर चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. त्यामुळे प्रचाराकडे अवघ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

शेतकऱ्यांच्या अनुदानासह त्या आगोदरच भ्रष्टाचाराचे मुद्यावर ही निवडणूक लढली जाणार असे स्पष्ट संकेत भाजपसह राष्ट्रवादीमधील मंत्र्यांच्या विरोधी गटाने दिले असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

दरम्यान, माजी आमदार संजय वाघचौरे देखील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पैठणमधून मंत्री भुमरे यांनी सोसायटीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, वाघचौरे हे देखील सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याची त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply