Take a fresh look at your lifestyle.

कॉंग्रेसच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत थोरातांनी सांगितले ‘हे’ वास्तव; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

नाशिक :

Advertisement

विधानसभा अध्यक्षपदी असलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा देऊन आता प्रदेश कॉंग्रेसची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला अध्यक्षपद मिळणार की उपमुख्यमंत्री हे पद यावरून वावड्या उठत आहेत. त्यावर पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पडदा टाकला आहे.

Advertisement

पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विषयाचे वास्तव स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेसच्या कोट्यातील विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील. काँग्रेसने कुठेही राष्ट्रवादीच्या कोट्यातील उपमुख्यमंत्री पदावर दावा केला नाही. मुळात यावरून चर्चा नेमकी का आणि कशा पद्धतीने सुरू झाली हाच खरा मुद्दा आहे.

Advertisement

आघाडी सरकारमध्ये आणखी एक उपमुख्यमंत्रिपद निर्माण केले जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील उपमुख्यमंत्रिपदावर दावा केल्याच्याही वावड्या उठल्या होत्या. तसेच शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद देण्याचीही चर्चा चालू आहे. त्यावर थोरात यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री हे आणखी एक वाढीव पद बनणार असल्याचा मुद्दा थंड पडणार आहे.

Advertisement

 हा विषयच मुळात कुठून जन्मास आला हेच मला कळत नसल्याचे स्पष्ट करून आगामी विधानसभा अधिवेशनात काँग्रेसचाच अध्यक्ष निवडला जाईल, असेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होईल, या विषयात तथ्य नसल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply