Take a fresh look at your lifestyle.

आता येणार स्वदेशी पेट्रोल; भाजप मंत्र्याने केला ‘हा’ दावा

मुंबई :

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. महागाईने लोकांना नको नको करून सोडले आहे. केंद्र सरकार अंतरराष्ट्रीय किमतीकडे बोट दाखवत आहे तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे… मात्र दरवाढ कमी करण्यासाठी सरकारकडून कोणतीही भूमिका घेतली जात नाहीये.

Advertisement

अशातच एका भाजप नेत्याने अजब-गजब दावा केला आहे. आत्मनिर्भर भारत होत असून आता भारतात स्वदेशी पेट्रोल आणणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटले आहे.

Advertisement

जागतिक बाजारातील कच्च्चा तेल्याच्या किमतींमुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. आता देशातच पेट्रोलची निर्मिती कशी होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात भारतात तयार झालेले पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध तयार करण्यात येईल. लवकरच देशवासीयांना स्वदेशी पेट्रोल मिळेल, असा दावा अश्विनी कुमार यांनी केला. 

Advertisement

जागतिक पातळीवरील किमती केंद्र सरकारच्या अखत्यारित येत नाहीत किंवा त्या केंद्राकडून निश्चित केल्या जात नाहीत. विरोधकांना देशवासीयांच्या कल्याणासाठी सुरू असलेली कामे दिसत नाहीत, असा आरोप अश्विनी कुमार चौबे यांनी यावेळी बोलताना केला.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply