मुंबई :
दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार आणि बाईक्समध्ये अनेक मोठ्या कंपन्या उतरत आहेत. विविध नवनवीन संशोधन घेऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा लागलेली आहे. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे.
Nexzu Mobility ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. ३१ हजार ९८० रुपये अशी या सायकलची किंमत असून Nexzu Rompus+ असे या सायकलचे नाव आहे. Nexzu Mobility कंपनीच्या वेबसाईटवरुन तुम्ही ही सायकल खरेदी करू शकता.
येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक सायकल अॅमेझॉन आणि पेटीएमवर विक्री सुरू करणार आहे.
असे आहेत भन्नाट फीचर्स :-
- इलेक्ट्रिक स्कूटर आणि नॉर्मल सायकल दोन्ही पद्धतीने वापर करता येतो.
- पॉवर साठी लिथियम ऑयन ५.२एएच बॅटरी
- BLDC 250W 36V ची मोटर
- फुल चार्ज होण्यास २.५ ते तीन तास लागतात
- स्लो, मीडियम आणि फास्ट अशा मोडचा समावेश
- ड्यूअल डिस्क इलेक्ट्रिक ब्रेक्स
- २५ किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा
- पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!