Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा बँक निवडणूक : विजय दणक्यात; मात्र, कर्डिलेंचा ‘तो’ दावा नाहीच ठरला खरा..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नगर तालुका सहकारी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल करताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी 100 ठराव भाजपच्या खिशात असल्याचे म्हटले होते. मात्र, निकालातून स्पष्ट झाले आहे की, त्यांचा दावा 100 टक्के खरा नव्हता.

Advertisement

भाजपचे नेते कर्डिले यांची राहुरीसह नगर आणि पाथर्डी तालुक्यात चांगली ताकद आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी नगर तालुक्यावरील आपले एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे. मात्र, 100 ठराव ताब्यात असल्याने 100 मतदान मिळण्याचा त्यांनी केलेला दावा या निकालातून सत्यात उतरू शकलेला नाही.

Advertisement

यां निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तर, रविवारी सकाळी निकाल जाहीर झाले. नगर तालुक्यात झालेल्या 109 मतदारांपैकी तब्ब 94 जणांनी कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर, आघाडीच्या उमेदवार सत्यभामा बेरड यांनी 15 मतदान मिळवले आहे. कर्डिले गटाने 100 मतदान घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसारविचार करता त्यांचे 6 मतदार फोडण्यात आघाडीला यश आले की काय अशीच सध्या तालुक्यात चर्चा आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply