Take a fresh look at your lifestyle.

‘टोपी फिरली की राजकारण फिरतं’ म्हणत कर्डिलेंनी दाखवून दिले; नगरच्या राजकारणाचा अजितदादांनाही आला ‘कटू’ अनुभव

अहमदनगर :

Advertisement

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. या निवडणुकीची चर्चा जोरदार होती. अगदी राज्यातील नेतेही या निवडणुकीकडे लक्ष ठेऊन होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आणि सगळे राजकारण आपल्या पद्धतीने फिरवले.

Advertisement

जिल्हा बँकेच्या संचालकांच्या मंडळाच्या निवडणुकीसाठी नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातूनविद्यमान संचालक शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी उमेदवार सत्यभामा बेरड यांचा ९४ मतांनी पराभव केला. 

Advertisement

शेवटपर्यंत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी झटलेल्या कर्डिलेंना निवडणुकीला सामोरे जावे लागले. आधीच आमदारकी गमावलेल्या कर्डिलेंना आपले अस्तित्व पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिद्ध करायचे होते.

Advertisement

जिल्हा बँक निवडणुकीत ‘कर्डिले म्हणतील तसं’ हे वातावरण होतं. आमदारकी गेली आणि कर्डिलेंना विरोध वाढत गेला. अशातही मातीतल्या कुस्तीत वस्ताद असणार्‍या कर्डिले यांनी थोरातांच्या मागे फिरण्यापेक्षा अजितदादांची एकदा गाठ घेतली असती तर त्यांना बिनविरोधचा गुलाल उधळता आला असता.

Advertisement

‘टोपी फिरली की राजकारण फिरते’ या म्हणीला आता फूलस्टॉप लागला आहे, असे म्हणत कर्डिले समर्थकांना डिवचले गेले. कर्डिले यांना विखे आणि मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेल्या डावाचा अंदाज न आल्याने अखेरीस कर्डिलेच एकाकी झाले. मात्र तरीही चितपाठ होईपर्यंत कुस्ती संपलेली नसते,  हे लक्षात घेऊन कर्डिलेंनी कडवी झुंज दिली.

Advertisement

आता पुन्हा एकदा ‘टोपी फिरली की राजकारण फिरते’ हे यानिमित्ताने सिद्ध झाले. तसेच अजितदादा पवारांनाही या नगरी राजकारणाचा अंदाज यानिमित्ताने आला.      

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply