अहमदनगर :
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नगर तालुका सोसायटी मतदारसंघावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी या जागेवर दणक्यात विजय संपादन करून आघाडीला त्यांची खरी ‘ताकद’ दाखवून दिली आहे.
भाजपचे कर्डिले हे या निवडणुकीत सर्वांच्या चर्चेत होते. त्याला निमित्त होते ते त्यांची निवड बिनविरोध न झाल्याच्या घटनेला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी सर्व ताकद एकवटून यंदाच्या निवडणुकीत किमान कर्डिले यांच्याकडील काही मतदार फोडण्यासाठीचे प्रयत्न झाले. मात्र, कर्डिले यांनी आपली खरीखुरी ताकद दाखवून देत जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळात जाण्याची किमया साधली आहे. कर्डिले यांनी तब्बल 79 मतांनी विजय मिळवला आहे.
एकूणच ही निवडणूक नगर तालुक्यात आघाडीने दणक्यात लढवण्याचे प्रयत्न केले. मात्र, गावोगावी मतदारांचे गठ्ठे असलेल्या आघाडीकडे सोसायटी सदस्यांची वानवा अजूनही कायम आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कर्डिले गटाला यशस्वी आव्हान देणाऱ्या आघाडीला बाजार समिती, जिल्हा बँक आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत यश मिळत नाही. याही निवडणुकीच्या निमित्ताने आघाडीकडे ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्यांची वणवा प्रकर्षाने जाणवली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट