Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक निकाल : ‘त्याच्यामध्ये त्याठिकाणी’ कर्डिलेंनी उधळला गुलाल, वाचा कुठे, कोण झाले विजयी

अहमदनगर :

Advertisement

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. या निवडणुकीची चर्चा जोरदार होती. अगदी राज्यातील नेतेही या निवडणुकीकडे लक्ष ठेऊन होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आणि सगळे राजकारण आपल्या पद्धतीने फिरवले.

Advertisement

17 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर 4 जागांसाठी निवडणूक लागली होती. राजकारणात ‘वस्ताद’ समजल्या जाणार्‍या कर्डिले यांची खेळी ऐनवेळी हुकल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. कर्डिले यांना आणि मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेल्या डावाचा अंदाज न आल्याने अखेरीस कर्डिलेच एकाकी झाले. मात्र माजी आमदार राहिलेल्या या वस्तादाने म्हणजेच शिवाजीराव कर्डिलेंनी गुलाल उधळला आहे.

Advertisement

जिल्हा बँक निवडणुकीत ‘कर्डिले म्हणतील तसं’ हे वातावरण होतं. आमदारकी गेली आणि कर्डिलेंना विरोध वाढत गेला होता. मात्र आता पुन्हा एकदा ‘टोपी फिरली की राजकारण फिरते’ ही म्हण आता पुन्हा जिल्ह्याच्या राजकरणात चालणार आहे.

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक उदय गुलाबराब शेळके यांनी १०५ पैकी मते ९९ घेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा धुव्वा उडविला.

Advertisement

नगरमध्ये शिवाजी कर्डीले यांनी ९४ मते घेऊन तर, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ १ मतांनी विजयी झाले आहेत.व पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी तब्बल २०१ मतांनी पानसरे यांचा पराभव केला आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply