Take a fresh look at your lifestyle.

‘गो करोना’चा नारा पुन्हा बुलंद; म्हणून ‘त्या’ ठिकाणी 15 मार्चपर्यंत आठवडी बाजार राहणार बंद..!

औरंगाबाद :

Advertisement

करोना विषाणूची आणखी एक लाट आल्याने अवघ्या महाराष्ट्रात सध्या खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. लस आलेली असतानाच ही लाट आल्याने आता परभणी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Advertisement

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहे. त्याचे काटेकोर पालन आणि नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व गावे व शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात आलेले आहेत.

Advertisement

सद्य:स्थितीत जिल्ह्यात प्रादुर्भाव संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ मार्चपर्यंत परभणी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत, असे आदेश बजावले गेले आहेत.

Advertisement

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याने गर्दीच्या ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरताना नागरिक सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, तोंडावर मास्क न लावता संचार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply