Take a fresh look at your lifestyle.

पुजा चव्हाण प्रकरणावरुन करुणा धनंजय मुंडें आक्रमक; म्हणाल्या…

मुंबई :

Advertisement

सध्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. यावरुन राज्याच्या राजकाणातही खळबळ माजली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ज्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. 

Advertisement

अशातच गेल्या काही दिवसांपासून माध्यमांना बगल देणार्‍या मंत्री संजय राठोड यांनी अखेर माध्यमांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. पुजाच्या आत्महत्येपासून मंत्री संजय राठोड हे मुंबईत होते.

Advertisement

अशातच या प्रकरणावरून करुणा धनंजय मुंडे या आक्रमक झाल्या आहेत. जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजाबरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा?, असा खडा सवाल करुणा मुंडे यांनी केला आहे.

Advertisement

आम्ही न्याय मागतो भीक नाही पूजा चव्हाण यांची आत्महत्येची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणीही करुणा मुंडे यांनी केली आहे. दरम्यान आज सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृत्पी देसाई यांनी पुजाच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

Advertisement

या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आम्ही लढणार आहोत. यात ज्यांची नावे आली आहेत त्यांची नार्को टेस्ट करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी यावेळी देसाई यांनी केली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply