तरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितला उपाय
चेन्नई :
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती याआधीचे इंधनदराचे सर्व विक्रम मोडत आहेत. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये नॉर्मल पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये ते 99 रुपये प्रति लिटरच्या वर किंवा जवळपास आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 102.54 वर पोहोचले आहे. येत्या काही राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपये होणार असल्याची चिन्हे आहेत.
अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधन दरवाढीवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, शातील इंधन दरवाढ हा सध्या अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. इंधन दराची सध्याची स्थिती हाताळणे अवघड (vexatious) आहे.
यावेळी त्या चेन्नई सिटिजन फोरमने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पपश्चात चर्चासत्रात बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ग्राहकांना परवडणाऱ्या दरात पेट्रोल-डिझेल मिळावे,यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पुढाकार घ्यायाला हवा. त्यानी इंधन कर कमी केल्यास इंधन स्वस्त होईल.
असे आहेत इंधन कर :-
बेस प्राइस :- 29.34 रुपये प्रति लीटर
शिपिंग शुल्क :- 0.37 रुपये
एक्साइज ड्यूटी :- 32.98 रुपये प्रति लीटर
VAT:- 19.92 रुपये
डीलर का कमीशन :- 3.70 रुपये
प्राइस चार्ज टु डीलर्स :- 29.70 रुपये
डिझेल :-
बेस प्राइस :- 30.55 रुपये प्रति लीटर
शिपिंग शुल्क :- 0.34 रुपये
एक्साइज ड्यूटी :- 31.83 रुपये प्रति लीटर
VAT :- 11.22 रुपये
डीलर का कमीशन :- 2.54 रुपये
प्राइस चार्ज टु डीलर्स :- 30.89 रुपये
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट