Take a fresh look at your lifestyle.

पुजा चव्हाण प्रकरण : बेपत्ता मंत्री राठोड ‘अशा’ पद्धतीने येणार समोर; ‘त्यांनी’ केली घोषणा

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ सध्या अशा घटनांनी हादरले आहे, ज्या खरोखरच अत्यंत धक्कादायक आहेत. आधी मुंडे आणि आता राठोड प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार वेगळ्या दिशेने चर्चेत आले आहे.

Advertisement

राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणावरुन गोंधळ चालू आहे. या मृत्यूप्रकरणाला राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी राठोड हे माध्यमांसमोर येणार, असे म्हटले जात होते. मात्र अनेक गोल-गोल वळणानंतरही राठोड काही माध्यमांसमोर आलेले नाहीत. या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या मात्र मंत्री राठोड अद्यापही समोर आलेले नाहीत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

आज वाशिमच्या पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. असलेले वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली. यामुळे अखेर राठोड लोकांसमोर येणार आहेत. परंतू ते पूजा चव्हाण प्रकरणी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

Advertisement

काय आहे पोहरादेवी ठिकाण आणि त्याचे वैशिष्ट्ये :-

Advertisement

‘बंजारा समाज बांधवांची काशी’ म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मोडते.   

Advertisement

या क्षेत्रातील संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावतात.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply