Take a fresh look at your lifestyle.

कर्फ्यू लागू करण्याबाबत ‘त्या’ मंत्र्यांचे मोठे विधान; वाचा, नेमकं काय म्हटले त्यांनी

मुंबई :

Advertisement

सध्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. येथे लागोपाठ संक्रमितांची संख्या वाढत चालली आहे, ज्यामुळे ठाकरे सरकारने सक्त आदेश दिले आहेत. 

Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लागण्याची शक्यता वाढत आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा, पुणे आणि मुंबई अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. 

Advertisement

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे.

Advertisement

विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही, तर महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.

Advertisement

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply