चिकन मसाला हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल… काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसमधील सहकार्याने खूप चवदार बटाटा बनवून आणले होते. मी तो पदार्थ खाल्ला, अशी भन्नाट चव होती की काय सांगू?
हा बटाट्याचा पदार्थ इतका चवदार होता की मी बोटे चाटत राहिलो. मग मी त्याला विचारले की, या बटाट्याच्या भाजीत असे काय घातले आहे की, ज्यामुळे हा इतका झकास झाला आहे.
एमजी त्याने सांगितले की, यात माझ्या बायकोने चिकन मसाला टाकला आहे. आणि माझ्या बत्ती गूल झाली. लहानपनापासून मी कधी मांसाहार केलेला नाही. आणि आता थेट चिकन मसाला घातलेला बटाटाची भाजी खाल्ली होती.
आता पुढचा हातात असलेला घास खाऊ की नको? असे मला झाले होते. चिकन खाणे तर खूप दूरची गोष्ट आहे, स्पर्शही केलेला नाही. आणि आता मी थेट चिकन खाल्ले असे मला वाटू लागले.
माझा सहकार्याला माझ्या चेहर्यावरील भाव समजले. मग त्याने मला सांगितले की, मी चिकन नव्हे तर चिकन मसाला खाल्ला आहे… चिकन मसाला देखील सामान्य मसाल्यांसारखा कोरडा मसाला असतो. त्यात चिकनचा समावेश असतो.
चिकन मसाल्याला चिकन मसाला म्हणतात कारण चिकन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्व मसाल्यांचे हे मिश्रण आहे. जसे की, सांबर मसाला, छोले मसाला, पनीर मसाला हे सर्व चिकन मसाला मध्ये वापरले जातात.
आपल्यापैकी अनेकांना संभ्रम असेल की, की चिकन मसाला व्हेज असतो की नॉनव्हेज… लक्षात घ्या मंडळीहो… चिकन मसाला हा व्हेज असतो.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य