प्रत्येकाला नवीन नवीन कपडे घालायला आवडत असते. प्रत्येकालाच असे वाटत असते की, त्यांच्याकडे घालण्यासाठी खूप सारे कपडे असावेत. अशा परिस्थितीत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला कपड्यांचा इतके प्रेम असते मग जगातील बहुतेक यशस्वी लोक दररोज तेच ते किंवा एकसारख्या प्रकारचे कपडे का घालतात? स्टीव्ह जॉब पासून ते मार्क झुकरबर्ग पर्यंतचे अनेक यशस्वी लोक एकसारखे कपडे घालतात.
यशस्वी लोकांचे असे एकसारखे कपडे घालण्याच्या मागे बर्याच गोष्टी आहेत, जाणून घ्या त्याविषयी:-
- निर्णय घेताना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी :- एखाद्या दिवसात तुम्ही जितके निर्णय घेता, प्रत्येक निर्णयावेळी दिवसभर गुणवत्ता कमी कमी होत चाललेली असते. दिवसाची सुरुवात कोणते कपडे घालू या गोंधळाने झाली तर दिवसाच्या उर्वरित निर्णयावर त्याचा परिणाम होत असतो.
ओबामा देखील मुख्यतः राखाडी आणि निळ्या रंगाचे सूट घालतात. एखादी व्यक्ती आपली कामे करण्यासाठी निर्णय घेण्याच्या कौशल्यांचा जितका कमी वापर करतो तेवढी त्याची निर्णय घेण्याची गुणवत्ता जास्त चांगली असते. म्हणूनच मोठे मोठे लोक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. अर्थात त्यांच्याकडे विचार करण्यासारख्या बर्याच गोष्टी असतात.
- वेळ वाचतो :- एखाद्या व्यक्तीच्या कपाटामध्ये कपड्यांचा ओझे जितके कमी असेल, तितका जास्त वेळ त्याला उर्वरित काम करण्यास मिळतो. ज्याच्याकडे जास्त कपडे त्याचा जास्त वेळ कपडे कोणते घालावे, यात जातो.
- कमी कपडे म्हणजे कमी टेंशन :- जेव्हा एखादी व्यक्ती सामान्य कपडे घालण्यास तयार होते, तेव्हा त्याच्या मनात बर्याच गोष्टी चालू असतात. त्याने घातलेल्या कपड्यांमध्ये तो कसा दिसेल. ते जिथे जाणार आहेत, तिथे हे कपडे बरोबर असतील की नाही. अशा वेगवेगळ्या छोटछोट्या तणावाखाली लोक वावरत असतात.
- अनेक यशस्वी हॉलीवूड चित्रपट बनवणार्या क्रिस्तोफर नोलन यांचा असा विश्वास आहे की, कमी कपडे असल्याने फक्त तणावच कमी होत नाही तर ऊर्जाही कमी खर्च होते. जितके जास्त कपडे आपल्याकडे असतात, तेवढाच जास्त वेळ आपला कपडे हाताळण्यासाठी लागणार्या उर्जेत जातो.
- बॉलिवूड चित्रपटांचे शौक असणार्या लोकांना अब्बास-मस्तानचे नाव नक्कीच माहित असणार. हे दोन्ही भाऊ नेहमी केवळ पांढरा शर्ट आणि पांढरा पॅंट असा पोशाख परिधान केलेले दिसतात. दोघांनीही त्याच पद्धतीने घातलेला ड्रेस त्यांची एक वेगळी ओळख बनवतो. मार्क झुकरबर्गनेदेखील तेच ते कपडे घालून आपली एक वेगळी ओळख बनवलेली आहे.
- कमी कपडे म्हणजे कमी खर्च, असेही एक साधे लॉजिक आहे.
- कोणीतीही एक सामान्य स्त्री आपल्या आयुष्याचे तब्बल 1 वर्ष आपण कोणते कपडे घालायचे, याचा विचार करते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट