Take a fresh look at your lifestyle.

गायी, म्हशींनी पुरेपूर असलेल्या ‘या’ प्रसिद्ध गावात विकले जात नाही दूध, तिथे नाही चहाचे एकही दुकान; वाचा, या अनोख्या गावाची अनोखी कहाणी

दिल्ली :

Advertisement

जरी आग्रा जगभरात ताजमहालसाठी प्रसिद्ध आहे, परंतु या शहरालगतचे एक छोटेसे गावदेखील कमी प्रसिद्ध नाही. हे गाव प्रसिद्ध असण्याचे कारण ‘चहा’ हे आहे. होय, चहाप्रेमी असलेल्या, चहासाठी वेड्या असलेल्या भारतीय लोकांना प्रत्येक रस्त्यावर, रस्त्यावर, क्रॉसरोड्स, हायवेवर चहाची दुकाने बघायची सवय लागलेली असते. मात्र या गावात एकही चहाचे दुकान नाही.

Advertisement

आग्रापासून २ किमी अंतरावर असलेल्या या खेड्याचे नाव कुआन खेडा आहे. आपल्याला येथे चहाचे एक दुकानही सापडणार नाही. याचे कारण जाणून घेतल्यास आपण असे म्हणाल की, असे 21 व्या शतकातही घडते.

Advertisement

वास्तविक पाहता या गावात दूध विक्री करणे पाप समजले जाते. या गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, जर कोणी दूध विकले तर संपूर्ण गावावर दुखा:चा डोंगर कोसळेल. तसेच ज्याने दूध विकले आहे, त्या व्यक्तीबाबत काहीतरी अप्रिय घडेल. या अंधविश्वासामुळे गेल्या अनेक दशकांपासून येथे दूध विक्रीवर बंदी आहे.

Advertisement

आणि दूध नसताना इथे चहाचे दुकान कसे चालेल? आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, इथल्या प्रत्येक घरात तुम्हाला गाय-म्हशी बांधलेली दिसतील. म्हणजे दुधाचे उत्पादन होते, परंतु त्याचा व्यवसाय झालेला नाही.

Advertisement

आता तुम्ही विचार करत असाल की, हे लोक या दुधाचे काय करतात? तर या गावातील लोक हे दूध घरीच वापरतात आणि दूध शिल्लक राहिल्यास ते पैसे न घेता ते इतर गावातील लोकांना देतात.

Advertisement

याबद्दल बोलतांना गावचे प्रमुख राजेंद्र सिंह म्हणाले- ‘आमच्या गावात बर्‍याच वर्षांपासून हे घडत आहे. जर कोणी हा नियम मोडला तर त्याचे काहीतरी वाईट होईल.

Advertisement

आता भलेही तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणा, मात्र या गावात खरोखर एकही चहाची दुकान नाही. माझ्यासारख्या चहाप्रेमी माणसाला हा लेख लिहावा लागतोय… हीच जास्त दुख:ची बाब आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply