वाळूचोराला झटका : तहसीलदार जोमात, वाळूचोर कोमात; इतिहासात कधीच झाली नाही ‘अशी’ कारवाई
अहमदनगर :
अहमदनगर नेहमी राजकीय अंगाने चर्चेत येत असते. तसा नगर जिल्ह्याला मोठा इतिहास आहेच, मात्र तो कधीकधीच चर्चेत असतो. आता नगर जिल्ह्यातील संगमेनरच्या तहसीलदाराने वाळूचोराला असा काही झटका दिला आहे की, अशी घटना इतिहासात कधीच घडलेली नाही.
तहसीलदाराने वाळूचोराला दंड केल्याच्या किंवा पाठलाग केल्याच्या घटना आपण पहिल्या असतील. मात्र वाळूचोराने दंड भरला नाही म्हणून संगमेनरच्या तहसीलदाराने चक्क वाळूचोराची जमीनच जप्त करून घेतली आहे.
अनेक पळवाटा शोधूनही वाळू चोराने दंड न भरल्याने तहसीलदाराने ही कारवाई केली आहे. वाळूचोराच्या सात बारा उताऱ्यावर तशी नोंद घेत चाळीस लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. महसूल अधिनियमातील तरतुदीचा वापर करण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगण्यात येते.
या घटनेमुळे ‘तहसीलदार जोमात आणि वाळूचोर कोमात’ अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. या कारवाईमुळे वाळुतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण :-
अजिज दिलावर चौगुले यांना साकूरमध्ये मातीमिश्रीत वाळू उत्खननास परवानगी देण्यास आली होती. चौगुले यांनी मातीमिश्रीत वाळुच्या नावाखाली मुळा नदी पात्रातून दिवसरात्र हजारो ब्रास वाळु उपसा केला.
ही गोष्ट लक्षात आल्यावर तपासणी केली गेली आणि चक्क शंभर ब्रास वाळू उपसा बेकायदेशीरपणे झाल्याचे उघड झाले. त्यामुळे चाळीस लाख रुपयांच्या दंडाची नोटीस गेल्यावर्षी २५ फेब्रुवारी २०२० ला पाठविली होती.
मात्र आजवर दंड वसूल न झाल्याने चौगुले यांच्या मालकीच्या साकूर येथील जमिनीवर जप्तीची कारवाई केली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट