स्ट्रॉबेरी असे म्हटले किंवा याचे फोटो पाहिले तरी लगोलग तोंडाला पाणी सुटते. मात्र, महाबळेश्वर किंवा थंड हवेच्या ठिकाणीच याचे उत्पादन घेतले जात असल्याने अवर्षणप्रवण भागातील जनतेला या फळाची तितकी गोडी चाखता येत नाही. यावरच मार्ग काढण्यात सोलापूरकरांना यश आलेले आहे.
उत्तर सोलापूर सारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यातही लालचुटुक स्ट्रॉबेरी उत्पादित होऊ शकते, लोकमंगल कृषी महाविद्यालयाने सिद्ध करून दाखवले आहे. स्टिक मल्चिंगचा वापर करून फ़क़्त १० गुंठ्यावर त्यांनी सुमारे ३७५ किलो इतके उत्पादन घेतले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील शेतकऱ्यांनी सलग दोन वर्षे स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. त्याच धर्तीवर आता उत्तर सोलापूर तालुक्यात वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयानेही या वर्षी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. त्याला चांगले यश मिळाले आहे.
दहा गुंठे क्षेत्रावर केलेल्या या लागवडीतून त्यांना आतापर्यंत दीड लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. महाबळेश्वर येथून यासाठी रोपे मागविण्यात आले होते. ४५ दिवसांत उत्पादनास सुरुवात झाली. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीप्रमाणेच वडाळा येथे उत्पादित झालेली स्ट्रॉबेरी चवीला तितकीच सरस असल्याचा दावा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी केला आहे.
इतर महत्वाचे मुद्दे असे :
- लागवडीसाठी हलकी जमीन निवडली
- भुरी व करपा वगळता इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही
- मावा व तुडतुडे यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी फवारणी
- तीन महिन्यांत जवळपास ३७५ किलोंचे उत्पादन
- चारशे रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य