Take a fresh look at your lifestyle.

फेसबुकचा ‘तो’ खोटेपणाही झाला उघड; पहा कशी केली जातेय फसवणूक ते

मुंबई :

Advertisement

फेसबुक ही सुप्रसिद्ध उद्योगपती मार्क झुकेरबर्ग यांची कंपनी आहे. सध्या जगभरात एक माहितीचे आणि जाहिरातीचे साधन म्हणून ही कंपनी ओळखली जाते. मात्र, निवडणुकीतील डेटा मॅन्युप्युलेशनसह आता आणखी एका बाबतीत कंपनी फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

कॅलिफोर्नियात दाखल एका खटल्यातील दस्तऐवजातून फेसबुक कंपनीचे बिंग फुटले असल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे.  फेसबुकवर जाहिराती पाहणाऱ्यांची संख्या कंपनीने अवास्तव वाढवून सांगितली. वर अधिक महसुलासाठी समस्यांकडे दुर्लक्ष केले. कंपनीच्या व्यवस्थापकांना माहिती होते की त्यांचे हे निकष दिशाभूल करत आहेत. परंतु, महसूल बुडेल म्हणून तेही गप्प आहेत, असे त्या दस्तऐवजातून स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

एकूणच निवडणूक हस्तक्षेप आणि लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारी ही कंपनी ग्राहकांची थेट फसवणूक तर करीत नाही ना, याच शंकेला यामुळे आणखी बळ मिळाले आहे. सध्या ऑस्ट्रेलिया देशातही कंपनीने आपल्या मुजोरीचा नमुना दाखवला आहे. त्यावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

सोशल मीडियावर ‘डिलीट फेसबुक’ आणि ‘बायकॉट झुकेरबर्ग’ सारख्या अभियानांनी वेग घेतला आहे. फेसबुकने ऑस्ट्रेलियात बातम्यांसह इतर माहितीवर बंदी घालून लोकशाहीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे जगभरातील नेते त्यांच्याविरुद्ध कायदे करण्यास सरसावतील, अशी स्थिती आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply