Take a fresh look at your lifestyle.

बाबो… विनामास्क फिरणार्‍यांवर मुंबई मनपाची कारवाई; एका दिवसात वसूल केलेला दंड वाचून व्हाल शॉक

मुंबई :

Advertisement

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. येथे लागोपाठ संक्रमितांची संख्या वाढत चालली आहे, ज्यामुळे ठाकरे सरकारने सक्त आदेश दिले आहेत.  कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

Advertisement

अनेक ठिकाणी लॉकडाउन लागण्याची शक्यता वाढत आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा, पुणे आणि मुंबई अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. 

Advertisement

मुंबईत संसर्ग पसरण्याची जास्त भीती असल्याने विनामास्क फिरणार्‍यांवर मुंबई मनपा धडक कारवाई करत आहे. लोकांना गांभीर्य नसल्याने ही कारवाई मोहीम जोरात चालू आहे. विनामास्क फिरणार्‍या मुंबईकरांनी एका दिवसात भरलेला दंड वाचून तुम्हीही नक्कीच शॉक व्हाल.

Advertisement

आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांकडून 31 कोटी 79 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काल (शुक्रवार 19 फेब्रुवारी) एका दिवसातच मुंबईभरातील 24 वॉर्ड मध्ये 13,592 जणांवर कारवाई करण्यात आली. एका दिवसात पालिकेकडून 27 लाख 18 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply