Take a fresh look at your lifestyle.

पूजा चव्हाण प्रकरणात तृप्ती देसाईंची एंट्री; थेट घेणार ‘त्यांची’ भेट

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ सध्या अशा घटनांनी हादरले आहे, ज्या खरोखरच अत्यंत धक्कादायक आहेत. आधी मुंडे आणि आता राठोड प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार वेगळ्या दिशेने चर्चेत आले आहे. राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणावरुन गोंधळ चालू आहे. या मृत्यूप्रकरणाला राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे.

Advertisement

अशातच आताच हाती आलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या पुजा चव्हाणच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. थोड्याच वेळात त्या परळीला जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. तसंच कुटुंबीयांचं सांत्वन करणार आहे.

Advertisement

अद्यापही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्य समोर आल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाच्या काही ऑडिओ क्लिप्स सध्या व्हायरल होत आहे. राठोड यांनी राजीनामा दिल्याचेही समजत आहे.

Advertisement

सर्वात महत्वाची बाब म्हणजे राठोड हे अजूनही माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळेही गुंता अजूनच वाढला आहे. राठोड आणि एका व्यक्तीच्या ऑडिओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Advertisement

या प्रकरणात ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहे.  या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे.      

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply