म्हणून जगभरात सुरू आहे ‘#डिलीट-फेसबुक’चा ट्रेंड; पहा कशात मुजोरी केलीय झुकेरबर्गनी

पुणे :
सोशल मिडीयामध्ये दादा कंपनी म्हणून नावारूपास असलेल्या फेसबुक आणि कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची मुजोरी आता जगभरात चर्चेत आहे. निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासह आता सरकारचे नियम पायदळी तुडवाण्याचे पातकही या कंपनीने केल्याने जगभरात ‘#डिलीट-फेसबुक’चा ट्रेंड सुरू झालेला आहे.
सोशल मीडियावर ‘डिलीट फेसबुक’ आणि ‘बायकॉट झुकेरबर्ग’ सारख्या अभियानांनी वेग घेतला आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते ऑस्ट्रेलिया सरकारच्या नव्या कायद्याचे. गुगल आणि फेसबुक अशा कंपन्या बातम्या आणि माहितीवर अब्जावधी डॉलर कमावतात. त्यातलाच काही वाट त्यांनी पत्रकार, लेखक व माध्यम संस्थांना शेअर करण्याचे हे विधेयक आहे.
गुगल कंपनीने सरकारचे कायदे लक्षात घेऊन अखेरीस यास मान्यता दिली आहे. तर, फेसबुक कंपनीने थेट बातम्या व आकस्मिक पोस्ट बंद करून आक्रमक बाणा दाखवला आहे. त्यामुळे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या मुद्द्यावर पाठिंब्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कॅनडा, फ्रान्स व ब्रिटनच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. आता फेसबुकविरुद्ध कायदेशीर लढाईची तयारीही ऑस्ट्रेलियाने सुरू केली.
फेसबुकची धमकी सिद्ध करते की या कंपन्यांना आता आपण सरकारपेक्षाही मोठे झालो आहोत, असा दंभ निर्माण झाला आहे. नियमांचे बंधन लागू होऊ शकत नाही, असा त्यांचा भ्रम आहे. अशा जग बदलत आहेत. परंतु, याचा अर्थ त्या जग पण चालवतील, असा नव्हे. ते संसदेवरही दबाव आणू पाहत आहेत. न्यूज मीडिया बार्गेनिंग विधेयकावर ऑस्ट्रेलिया मतदान घेत आहे. त्याचवेळी कंपन्या मुजोरी दाखवीत आहेत, असे मॉरिसन यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या डिजिटल, सांस्कृतिक व माध्यम समितीचे प्रमुख ज्युलियन नाइट म्हणाले, फेसबुकला शरण येण्यास भाग पाडण्याची गरज आहे. ब्रिटनमध्येही न्यूज कंटेंटसाठी त्यांना पैसे द्यावे लागतील.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!