Take a fresh look at your lifestyle.

जाऊ द्या ना ताई! म्हणत भाजप नेत्याने सुप्रिया सुळेंना दिला ‘त्या’ चौकशीचा इशारा; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

Advertisement

नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगितुरा सुरू झालेला आहे. नवी मुंबईतील गणेश नाईक यांची आता अनेक शिलेदारांनी साथ सोडलेली आहे. त्यानंतर नाईक यांनी ‘अंतरराष्ट्रीय गुंड ओळखीचे असल्याचे’ असल्याचे विधान केले होता.

Advertisement

यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी नाईक यांचा समाचार घेत एसआयटी चौकशीचा इशारा दिला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी म्हटले की, गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत.

Advertisement

पुढे त्यांनी म्हटले आहे की, आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे..पुजा चव्हाणचा मृत्यू..अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!  

Advertisement

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे :-

Advertisement

महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदेच्या अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply