Take a fresh look at your lifestyle.

अवकाळी पावसामुळे पिकाला मोठा फटका; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रात कुठे, किती झालेय नुकसान

मुंबई :

Advertisement

सध्या कधी ढगाळ, कधी पावसाचे तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका द्राक्षसारख्या पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Advertisement

हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे बहुतांश ठिकाणी पाऊस झाला आहे. तसेच पिकांचेही नुकसान अनेक ठिकाणी झाले आहे. लातूरमध्ये तर थेट काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Advertisement

नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील अर्धापूर, मुखेड, नांदेड, नायगाव,बिलोली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला ज्वारी, गहु, केळी, भुईमूग,हरभरा पिके भुईसपाट होऊन मोठे नुकसान झालंय. टमाटा, वांगी, मिर्ची हा भाजीपाला आणि फळबागांचं ही मोठं नुकसान झालंय.

Advertisement

गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे मात्र अतोनात नुकसान नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ज्वारी, गहू, द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Advertisement

शेतकरी आणि फळ बागायतदारांना हा अवकाळी पाऊस कदाचित मोठ्या अडचणीत आणू शकतो, असा अंदाज सांगितला जात होता. अहमदपूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी गहू, ज्वारी, हरभरा व करडीची पेरणी केली. डिसेंबरमध्ये पडलेल्या दाट धुक्यामुळे ज्वारीवर चिकटा, गव्हावर तांबोरा व हरभऱ्याची फुल गळती झाली.

Advertisement

अधून – मधून वारा वाहत असल्याने ज्वारी व गव्हाची उभी पिके आडवी पडली.  एवढ्यावरच पाऊस थांबला नाही तर काढणी केलेले आणि काढलीस आलेले गहू, ज्वारी व हरभरा हातचा जातो की काय असे शेतकरी वर्गात सर्वत्र बोलले जात आहे.

Advertisement

अवघ्या काही दिवसात ज्वारीची काढणी केली जाणार होती. मात्र आता ही सगळी पिकं झोपल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच चिंतातुर होते त्यात दोन झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांची स्वप्नंच हिरवून घेतली आहेत. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply