Take a fresh look at your lifestyle.

सलग बाराव्या दिवशीही उडाला महागाईचा भडका; वाचा, काय आहेत इंधनाचे ताजे दर

मुंबई :

Advertisement

देशभरात आणि जगात पेट्रोल आणि डिझेल किंमती आर्थिकदृष्ट्या संवेदनशील आहेत. भारताबद्दल बोलायचं झालं तर बर्‍याच राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. हे प्रथमच घडत आहे, जेव्हा ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपये खर्च करावे लागत आहेत.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीतील बदलाचा निश्चितच भारतीय बाजारात परिणाम होत आहे. यावर्षी जानेवारीपासून ब्रेंट क्रूडच्या किंमतीत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्राबाबतीत बोलयाचे झाले तर आज सलग बाराव्या दिवशीही इंधन दरात वाढ झाली आहे.

Advertisement

मुंबईत आज पेट्रोल 96.94 रुपये आहे तर डिझेल 88.01 रुपयांवर पोहचले आहे. आजही मुंबईत पेट्रोलमध्ये 37 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलही 39 पैशांनी वधारले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात नियंत्रणात आणून दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होतांना दिसते आहे.

Advertisement

असे आहेत देशातील प्रमुख शहरांचे दर :-

Advertisement

मुंबई – पेट्रोल 96.94 रुपये, डिझेल 88.01 रुपये
दिल्ली – पेट्रोल 90.58 रुपये, डिझेल 80.97 रुपये
चेन्नई – पेट्रोल 92.59 रुपये, डिझेल 85.98रुपये
कोलकाता – पेट्रोल 95.33 रुपये, डिझेल 84.56 रुपये

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply