मुंबई :
परखड आणि स्पष्ट बोलणारे अशी प्रतिमा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत नाना पटोले यांनी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. याच पार्श्वभूमीवर करोनाचे कारण पुढे करत सरकार विधानसभा अध्यक्षपद निवडीला घाबरतंय म्हणून अधिवेशन घेतले जात नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
त्याला उत्तर देताना अजित पवारांनी सांगितले की, निवडीला कोणीही घाबरत नाही. निवडीला घाबरलो असतोच तर विधानसभा अध्यक्षाचा राजीनामाच आम्ही घेऊ दिला नसता. मला आणि मुख्यमंत्र्यांनी भेटून व त्याच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून, महाविकास आघाडीत नेत्यांना भेटूनच नाना पटोले यांनी राजीनामा दिला. आज सरकार बहुमतात आहे.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सरकार पडेल म्हणत विरोधी पक्ष तीन-तीन महिने वाढवत आहे. सरकार स्थापन होऊन सव्वा वर्षे झाले आहे. सध्या तरी सरकारला कुठलाही धोका नाही.
पेट्रोल दरवाढीला तत्कालिन सरकार जबाबदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालत नाही. मागच्यांनी काय केले, हे सरकारने सांगण्यात काडीमात्रही अर्थ नाही. तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय. मागच्यांनी केलेल्या चुका दुरूस्त करून लोकांना कशी मदत होईल, हे त्यांनी पाहिले पाहिजे.’
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव