Take a fresh look at your lifestyle.

बाबो.. लस घेतलेल्या ‘इतक्या’ पोलिसांनाही पुन्हा झाला कोरोना; ‘त्या’ भागात वाढली चिंता

मुंबई :

Advertisement

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतान दिसू लागला आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये 3 मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोरोनावरील लस घेऊनही 2 डॉक्टरांना कोरोना झाल्याची घटना समोर आली होती.

Advertisement

आता अशातच 2 पोलिसांना लस घेऊनही पुन्हा कोरोनाने गाठल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यातील आहेत. या आधी लस टोचल्यानंतरही कोरोना पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. 

Advertisement

मात्र अनेकदा काहींनी एकदा डोस घेतलेला असतो. डोसची पूर्ण प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे कोरोना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. आता घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयातही एका फार्मसिस्टला कोरोनाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण दुसरा डोस घेण्यापूर्वीच तो एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यालाही कोरोना झाला.

Advertisement

राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही तिसर्‍यांदा कोरोना झाला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply