Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलच्या भाववाढीत ‘त्यांचा’ही हात; भरमसाठ मर्जीन खाण्याची ‘त्यांना’ही लागली सवय..!

मुंबई :

Advertisement

सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा आगडोंब उसळला आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारसह कंपन्यांनीही आपले मर्जीन वाढवले आहे. परिणामी ग्राहकांचे खिसे वेगाने खाली होत आहेत.

Advertisement

‘एक देश, एक कर’ अशी गोंडस घोषणा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने विक्रमी नोंद केली आहे. अर्थव्यवस्था सावरण्याच्या उद्देशाने मागील पाचेक वर्षे या दोन्ही जीवनावश्यक इंधनावर भरमसाठ कर आकारणी चालू आहे. आता तर त्याने उच्चांक गाठला आहे. त्यातच कंपन्यांनीही आपला हात यात आणखी मारला आहे.

Advertisement

केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापले कर कपात करण्यास तयार नाहीत. परिणामी भाव कमी होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. तर, सरकारी तेल कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे निकाल पाहिल्यास तिन्ही कंपन्या सरासरीपेक्षा जास्त ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन राखत आहेत.

Advertisement

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेलीं इंडियन ऑइल तर प्रत्येक १०० रुपयांवर सात रुपयांचा नफा कमावत आहे. दिवंगत नेते अरुण जेटली हे वित्तमंत्री असताना त्यांनीही कंपन्यांना सांगून प्रॉफिट मार्जिन कमी केला होता. आताही केंद्र आणि राज्य सरकार ऐकत नसताना वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर काहीच कार्यवाही केलेली नाही.

Advertisement

अनेक वर्षांपर्यंत कच्च्या तेलाचे भाव १०० डॉलरपेक्षा जास्त राहिले. अनेक वर्षांपर्यंत १४० डॉलरपर्यंत भाव राहिले. त्या वेळी एवढी दरवाढ झाली नव्हती. सध्या कंपन्यांचे प्राॅफिट मार्जिन खूप जास्त असतानाच सरकार कर घेऊन ग्राहकांना जास्त भावाने हे इंधन खरेदी करण्यासाठी बाध्य करीत आहे. त्यावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

वस्त आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर राज्य सरकारांकडे महसूल वाढवण्यासाठी मद्य आणि पेट्रोलियम हे दोनच पर्याय शिल्लक आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून कर कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. मात्र, केंद्राकडे इतर सर्व कर संकलन होत असतानाही त्यांनी कर कमी केले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply