‘त्यावरून’ संतापलेल्या संजय राऊतांचा महाविकास आघाडीला सल्ला; विरोधीपक्षालाही सांगितली ‘ती’ गोष्ट
मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज कोविडचे वाढते रुग्ण या विषयावर भाष्य केले आहे. यावेळी विरोधी पक्षालादेखील सुनावले आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-
प. बंगालात भाजपला विजय मिळवायचा आहे हे ठीक, पण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. बंगालातील जाहीर कार्यक्रमांत गृहमंत्री व त्यांचे सहकारी ‘मास्क’ न लावता किंवा ‘मास्क’ नाकाखाली ओढून ममतादीदींवर हल्ला करताहेत.
अशात कोरोनाच्या विषाणूने त्यांना दगाफटका केला तर कसे व्हायचे? आम्हाला त्यांच्या तब्येतीची चिंता वाटते म्हणून हे सांगायचे. ‘मास्क’ हीच लस आहे याचा विसर लोकांना पडला आहे. बाजारात कोरोनाची ‘लस’ आली आहे, पण लस घेऊनही लोकांना कोरोनाने पकडले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील देशांनी कोरोना लसीची 10 लाखांची खेप हिंदुस्थानला परत पाठविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. बहुदा तिकडला कोरोना जरा आडदांड आहे, लसीने तो मरणार नाही असेच एकंदरीत दिसते. महाराष्ट्रातही आता सरकारने आडदांडपणे वागावे, नाहीतर कोरोना पुन्हा हाहाकार माजवेल. विरोधकांनी स्वतः नियम पाळावेत.
लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलने या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण हवेच, मास्कची सक्ती तर असायलाच हवी. नियम मोडणाऱयांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. 19 तारखेस शिवजयंतीच्या निमित्तानेसुद्धा राजकारण झालेच.
छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा कोरोनाचे संकट पाहता रयतेच्या रक्षणासाठी कठोर निर्बंध लावलेच असते हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. राजकीय मेळावे, लग्न समारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसत नाहीत.
लोक बेपर्वा का आहेत? परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील असा इशारा कोरोनासंदर्भातील राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. निदान डॉक्टरांचे तरी ऐका!
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ..आणि ‘त्या’ नेत्यांसह केंद्रप्रमुखांचा अर्थपूर्ण प्रयत्न फसला; शिक्षकांच्या सतर्कतेचा परिणाम..!
- आणि त्यांनी थेट डॉक्टरांच्या नावानेच मागितले कर्ज; पहा कुठे उघडकीस आला लाखोंचा कर्जघोटाळा..!
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक