मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज कोविडचे वाढते रुग्ण या विषयावर भाष्य केले आहे. यावेळी विरोधी पक्षालादेखील सुनावले आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-
‘हे उघडा आणि ते उघडा, नाहीतर आंदोलने करू,’ अशा धमक्या विरोधक देत राहिले, कोरोना नियमांचेही राजकारण केले गेले. त्याचा फटका जनतेला व राज्याला बसत आहे. मध्यंतरी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत होती. मात्र त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा विसर पडला. नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा सुरू झाला.
त्या बेजबाबदारपणास विरोधकांनी इतके खतपाणी घातले की, सरकारलाच जणू खलनायक केले. आता जो कोरोना वाढत आहे, त्याची जबाबदारी राज्यातील विरोधक घेणार आहेत काय? अमरावती, यवतमाळ, अकोल्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तेथे सध्या तरी जमावबंदी लागू केली, पण काही जिल्हय़ांत पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल असे वातावरण आहे.
सरकारने एकदा निर्णय घेतला की, त्याबाबत सारासार विचार न करता विरोधकांनी फक्त थयथयाट करायचा, हे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरे नाही. देवळे उघडली, लोकल ट्रेन्स सुरू झाल्या, बाजार उघडले; पण लोक नियमांचे पालन करायला तयार नाहीत, हे कसे चालेल?
सार्वजनिक ठिकाणी परस्परांतील अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे ही बंधने पाळली गेलीच पाहिजेत. मात्र अनेकदा ती एका बेफिकिरीने झुगारून देताना लोक दिसतात.
दोनच दिवसांपूर्वी ‘सैराट’मुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिने नांदेड येथील एका उत्सवात हजेरी लावली. तेव्हा तिला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्यावेळी कोरोना नियमांचा सपशेल फज्जा उडालेला दिसला. सांगलीतील विटा येथे देखील असेच घडले. हेच होणार असेल तर कोरोना विषाणूला अटकाव बसणार कसा?
आम्ही अनेकदा पाहिले, राज्याचे विरोधी पक्षनेतेही ‘मास्क’ न लावता सार्वजनिक कार्यक्रमात वावरतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी तर चांगले नाहीच, पण नेते म्हणून जनतेला कोणती दिशा देत आहात?
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक