Take a fresh look at your lifestyle.

आणि ‘त्या’ बँकेला बसला ३७०० कोटींचा फटका; कर्जाऊ ग्राहकांची झाली की चंगळ..!

बँकांनी ग्राहकांना पैसे देऊन मालामाल केल्याचे कधी ऐकले आहे का? नाही ना? कारण, बँक म्हणजे व्याज आणि दंड याद्वारे ग्राहकांचे खिसे मोकळे करणारी संस्था अशीच जगभराची भावना आहे. मात्र, अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध बँकेने आपल्या ग्राहकांना चुकीने का होईना लॉटरी लागल्याचा फील दिला आहे. त्या बँकेने तब्बल ३७०० कोटी थेट कर्जाऊ ग्राहकांना बहाल केले आहेत.

Advertisement

अमेरिकेतील जागतिक बँकिंग संस्था असलेल्या सिटी बँकेत मागील वर्षी एका क्लर्कने चुकून काही खात्यांतून पैसे ट्रान्सफर केले होते. बँकेने वसुलीचे खूप प्रयत्न केले, परंतु हे पैसे परत आलेच नाहीत. कारण, कर्जाऊ ग्राहक कंपन्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली. शेवटी बँकेने कोर्टाचे दार ठोठावले. मात्र, कोर्टानेही यात बँकेला दणका देत हे पैसे वसूल करण्याचा बँकेला अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

Advertisement

कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनने वित्तीय संस्थांकडून २०१६ मध्ये ७ वर्षांसाठी मुदतीचे कर्ज घेतले होते. त्यात कंपनीची लोन एजंट सिटी बँक आहे. ऑगस्ट २०२०मधील ही घटना आहे. व्याज म्हणून बँकेने वित्तीय कंपन्यांना ५९ कोटी रुपये द्यावयाचे होते. मात्र, चुकून व्याजाऐवजी मुद्दलाची ६,६६० कोटी रक्कम ट्रान्सफर झाली. त्याचे हे प्रकरण आहे.

Advertisement

त्यातील काही कंपन्यांनी २,९६० कोटी रुपये परत केले. मात्र, १० कंपन्यांनी ३,७०० कोटी परत केले नाहीत. त्यावर सुनावणी झाल्यावर बँकेला हा मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे.

Advertisement

या बँकेतून ऑनलाइन ट्रान्सफर तीन टप्प्यांत होत होते. याला सिक्स आय सिस्टिम असे नाव आहे. यात पहिल्या टप्प्यात एक कर्मचारी रक्कम फ्लेक्सक्यूब प्रोग्रॅममध्ये टाकत होता. बँकेचे बहुतांश प्रोग्रॅम भारतीय टेक कंपनी विप्रोने तयार केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात विप्रोचा कर्मचारी तपासणी करून मग तिसऱ्या टप्प्यात हे अप्रूव्ह केले जाई. मात्र, तिन्ही टप्प्यांवर हा घोळ लक्षात आलाच नाही. परिणामी पैसे कर्जाऊ खात्यात वर्ग झाले.

Advertisement

एखादी व्यक्ती किंवा कंपनीला असा पैसा परत मिळवण्याचा अधिकार असला तरी चुकून ट्रान्सफर झालेली ही रक्कम कंपन्या ठेवू शकतात, असे न्यायालयाने या निकालात म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply