Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीच्याच मंत्र्याने जीभ चावत कबुल केली ‘ती’ चूक; ज्याचा बसला 3-4 मंत्र्यांना फटका

मुंबई :  

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

Advertisement

अशातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही करोनाने गाठले आहे. एवढे पुढारीसुद्धा कोरोनाच्या तडाख्यातून सुटलेले नाहीत. गृहमंत्री अनिल देशमुख हेही आता कोरोनातुन कव्हर होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जीभ चावत एका चुकीची कबुली दिली आहे.

Advertisement

एकीकडे महाविकास आघाडीमधील 3-4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये ‘आमचे चुकतेय’असे म्हणत स्वतः जीभ चावली. 

Advertisement

दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय. खरं तर ही आमची मोठी चूक आहे आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, अशी प्रांजळ कबुली विश्वजित कदम यांनी दिली आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply