Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या फास्टेस्ट ई-बाईक लॉंच; एका चार्जिंगमध्ये जाणार 150 किलोमीटर, वाचा भन्नाट फीचर्स आणि किंमत

मुंबई :

Advertisement

क​बीरा मोबिलिटीने भारतात हाय स्पीड इलेक्ट्रिक बाइक्स लाँच केल्या आहेत. केएम 3000(KM3000) आणि केएम 4000(KM4000) अशी या लाँच केलेल्या बाईक्सची नवे आहेत. कंपनीचा असा दावा आहे की, या दोन्ही भारतातील ‘फास्टेस्ट’ इलेक्ट्रिक बाइक्स आहेत. एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर या बाईक्स 150 किमीपर्यंत प्रवास करू शकतात.

Advertisement

त्यांची टॉप स्पीड 120 किमी प्रतितास आहे. कबीरा मोबिलिटी हे एक स्टार्टअप आहे. या बाइक्सची डिलिव्हरी मे 2021 पासून सुरू होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. केएम 3000 ची एक्स-शोरूम किंमत 1,26,990 रुपये आहे आणि केएम 4000 ची एक्स-शोरूम किंमत 1,36,990 रुपये आहे.

Advertisement

दोन्ही दुचाकी पर्यावरणपूरक आहेत. 3.१ सेकंदात 40 किमीचा वेग त्या पकडू शकतात. दोन्ही बाइकचे बुकिंग 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सुरुवातीला ही बाइक दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, गोवा आणि धारवाड अशा नऊ शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Advertisement
  1. KM3000 :-
  2. 4kWh बैटरी
  3. BLDC (ब्रशलैस DC इलेक्ट्रिक मोटर)
  4. वजन 138 किलोग्राम
  5. ईको मोड मध्ये 120 किमी, सिटी रेंज मध्ये 95 किमी आणि स्पोर्ट्स मोड मध्ये 60 किमीचा प्रवास करता येऊ शकतो.  
  6. KM4000
  7. 4.4kWh बैटरी
  8. बाइक ईको मोड मध्ये 150 किमी, सिटी रेंज मध्ये 110 किमी आणि स्पोर्ट्स मोड मध्ये 90 किमी
  9. दोन्ही बाइकची टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply