स्वस्तात मस्त धमाका; बजाज कंपनीच्या ‘या’ 4 बाइक झाल्या स्वस्त, वाचा, किमती आणि फीचर्स
पुणे :
स्वस्तात मस्त गाडी देण्यात दुचाकीमध्ये बजाज आणि चारचाकीमध्ये मारुती सुझूकीचा कोणी हात धरू शकणार नाही. आताच हाती आलेल्या माहितीनुसार, ऑटो सेक्टरमध्ये अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या बजाज कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट पाऊल उचलले आहे.
Bajaj CT100, Bajaj CT110, Bajaj Platina 100, Bajaj Platina 110 H-Gear या गाड्या इतर गाड्यांच्या तुलनेत जास्त मायलेज देतात. ग्रामीण भागात या गाड्यांचा खप चांगला आहे. नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार असेल तर ही तुमच्या कामाची माहिती नक्कीच वाचा.
जाणून घ्या स्वस्त झालेल्या गाड्यांच्या किमती आणि फीचर्स :-
- Bajaj CT100 :-
– किंमत ४७ हजार ६५४
– इंजिन ४ स्पीड गियरबॉक्स
– बीएस६ कम्पलायंट १०२ सीसीचे ४ स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन इंजिन
– इंजिन ७५०० आरपीएमवर ७.९ पीएसचे मॅक्सिमम पॉवर आणि ५५०० आरपीएमवर ८.३४ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते
2) Bajaj CT110 :-
– किंमत ५४ हजार १३८
– बीएस ६ कम्पलायंट ११५.४५ सीसीचे ४ स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन
– इंजिन ७५०० आरपीएमवर ७.९ पीएसचे मॅक्सिमम पॉवर आणि ५५०० आरपीएमवर ८.३४ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते
– इंजिन ४ स्पीड गियरबॉक्स
3) Bajaj Platina 100 :-
– H-Gear चे इंजिन 4-स्पीड गियरबॉक्स ट्रांसमिशन
– १०२ सीसी, 4-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, DTS-i इंजिन
– Bajaj Platina 100 च्या ES DRUM व्हेरियंटची दिल्ली एक्स-शोरूम किंमत ५९ हजार ८५९ रुपये आहे. तर याच्या 100 ES DISC व्हेरियंटची किंमत ६३ हजार ५७८ रुपये आहे. तसेच याच्या 100 KS ची किंमत ५२ हजार ९१५ रुपये आहे.
4) Bajaj Platina 110 H-Gear :-
– 5-स्पीड गियरबॉक्स ट्रांसमिशन
– ११५ सीसी, ४-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन
– दिल्ली एक्स शोरूम किंमत ६४ हजार ३०१ रुपये
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक