Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्हा बँकेत भाजप नेत्यांमध्ये ‘कुरकुर’; वाचा, ‘त्याच्यामध्ये त्याठिकाणी’ काय घडला प्रकार

अहमदनगर :-

Advertisement

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपची पीछेहाट होणार, विखे एकाकी पडणार, भाजप सहकारात कायमच मागे असल्याचा फटका भाजपला या निवडणुकीतही बसणार, असे चित्र बर्‍यापैकी स्पष्ट दिसत असताना विखेंनी आपल्या राजकारणाची जादू पुन्हा दाखवली.

Advertisement

भाजपचे 4 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप बँक निवडणूकीची जबाबदारी घेणारे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे मंत्री थोरतांना जाऊन मिळाल्याचे दिसत होते. मात्र आता कर्डिलेंनी एक वेगळाच मुद्दा समोर आणला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले की, जिल्हा बँकेत राजकारण करायचे नाही म्हणून विखे आणि थोरात यांना एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी पार पाडली. हे सर्व माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनाही माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी खासदार डॉ. सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काही जागांसाठी तडजोडी करण्यासाठी कर्डिलेंनी पुढाकार घेतला होता. ते चर्चेसाठी गेले होते. इतर सर्व मुद्दयांवर निवडणूक निकालानंतर भूमिका मांडेन. कुणाला घाबरायचे कारण नाही.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट आणि बेधडक शैलीत सांगितले की, निकालानंतर टीकाटिप्पणी होईल आणि तीही जाहीरपणे होईल, यात शंका नाही.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply