म्हणून केली अर्जुन तेंडुलकरची निवड; वाचा, काय म्हटलेय मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक माहेला जयवर्धने आणि आकाश चोप्राने
मुंबई :
सध्या देशभरात अर्जुन तेंडुलकरची निवड हा चर्चेचा विषय बनला आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये पार पडला. या लिलावात एकूण 57 खेळाडूंना विविध फ्रँचायजींनी आपल्या ताफ्यात घेतलं.
यात अर्जुनला मुंबई इंडियन्सने त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. दरम्यान यानंतर अर्जुनवर सोशल मीडियावरुन घराणेशाहीच्या मुद्यावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सचिन तेंडुलकर याने शेतकरी आंदोलनाशी निगडीत ट्विटचीही पार्श्वभूमी अर्जुन तेंडुलकरच्या निवडीला जोडली जात आहे. मुंबईने अर्जुनला खरेदी करणं म्हणजे घराणेशाहीला खतपाणी घातल्यासारखंच आहे, असं काही नेटीझन्सचं मत आहे.
अशातच आता अर्जुनला संघात घेण्याच्या निर्णयाचे मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यानं समर्थन केलं. अर्जुनची निवड ही पूर्णपणे कौशल्याच्या आधारावर झाल्याचं जयवर्धनेनं स्पष्ट केलं.
जयवर्धनेने म्हटले आहे की, अर्जुन तेंडुलकरची निवड ही पूर्णपणे त्याच्या कौशल्यावर केली गेली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा हा टॅग त्याच्यावर लागला आहे, परंतु नशिबानं तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. त्यामुळे अर्जुनसारखी गोलंदाजी करता आल्यास सचिनलाही अभिमान वाटेल.
अर्जुन आता सर्वात यशस्वी फ्रँचायजीशी जोडला गेला आहे. मुंबईच्या गोटात अर्जुनला क्रिकेटबाबतीत सर्व छक्के पंजे शिकता येतील. अर्जुनने मुंबईसाठी विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन फक्त त्याच्या आडनावामुळे इथवर पोहचलेला नाही. तो काही न काही करत असतो. मुंबईला अर्जुन हवा होता, त्यामुळे मुंबई फ्रँचायजीने खरेदी केलं आहे, असं मत टीम इंडियाचा माजी खेळाडू राहिलेला आकाश चोप्रा याने मांडलं आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक